महापुरुषांना अभिवादन करुन प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा
कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन
कन्हान : - कन्हान शहर विकास मंच द्वारे २६ जानेवारी ७६ व्या प्रजासत्ताक दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले .
कार्यक्रमाचे अध्यक्ष मंच चे नवनिर्वाचित सदस्य चेतक पोटभरे , प्रमुख पाहणे माजी सैनिक जयवंत गटपाडे , राजु सहारे , शेख मोहम्मद , इसराईल शेख , अरविंद अंबासकर सह आदि मान्यवरांचा हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी , भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर , महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली .
यावेळी राष्ट्रीय तिरंगा झेंडाला सलामी देऊन राष्ट्रगीत गायन करण्यात आले . कार्यक्रमात मंच चे संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर , जेष्ठ नागरिक भरत सावळे , अशोक पाटील यांनी प्रजासत्ताक दिवसा वर उपस्थितांना मार्गदर्शन करुन शुभेच्छा दिल्या . मंच सदस्यांनी आणि नागरिकांनी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा करण्यात आला . कार्यक्रमाचे सुत्र संचालन अर्जुन पात्रे आणि आभार प्रदीप बावने यांनी केले .
या प्रसंगी मंच चे मार्गदर्शक भरत सावळे , प्रभाकर रुंघे , नाना ऊकेकर , चिंतामण शेंडे , नितिन मेश्राम , माहेर इंचुलकर , राजकुमार पटले , राहुल सोनबरसे , मोहम्मद शकीब शेख , संजय तिवसकर , अनुराग महल्ले , अरविंद कश्यप , सुजल यादव , शुभम बावनकर , हिमांशु कोसळकर , मुकुल शिवारकर , विक्रम यादव , चेतन वैद्य , गणेश भालेकर , चिराल वैद्य , प्रशांत पाटील , समशेर पुरवले , गणेश भालेकर , प्रितम शेंडे , बंडुजी इडपाते , रामलाल पट्टा , विठ्ठल ऊके , वामन मेश्राम , हुकुमराव देवगडे , लोकेश दमाहे , आदित्य बोरकर , प्रवीण टिक्काम , सचिन यादव , राजकुमार बावने , हरीओम प्रकाश नारायण , शिवा पात्रे , महेश लोंडे , सुर्याजी दारोडे , आशिष इंचुलकर , आकाश सरोदे सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर
0 टिप्पण्या
thank you for, you give me your most important time